निजामपूर येथे घराला आग लागून शेतकर्याचे नुकसान
बुलडाणा, दि. 10 - तालुक्यातील निजामपूर गावामध्ये 09 मे रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान संजय ज्ञानबा जाधव यांच्या घराला आकस्मिक आग लागून 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
संजय जाधव हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना सकाळी 10 वाजेदरम्यान घराला आग लागली. आगीमध्ये घरात ठेवलेले हळदीचे पोते, रोख वीस हजार रुपये, संसार उपयोगी सामान, शेतीउपयोगी अवजारे जळून खाक झाले आहे. गावातील नागरिकांनी कसोशीने प्रयत्न करून आआ आटोक्यात आणल्यामुळे जीवित हानी झाली नाही. सदर आगीत नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे, जी प सदस्य राजेश मापारी यांनी भेट दिली यावेळी तलाठी हिवरकर, कोतवाल संतोष जावळे, अशोक दहिभाते, पोलीस पाटील अर्जुन जाधव, उपसरपंच गजानन डोळस हजर होते.