Breaking News

सावरकरांचे नाव घेणार्‍या सत्ताधार्‍यांना त्यांची भूमिका मान्य नाही : खा. पवार

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : ’गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी माणसाने गाईचे मांसही खाल्ले आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली होती. सावरकरांचे नाव घेऊन सत्तेत बसणार्‍यांना त्यांची शास्त्रशुध्द भूमिका मान्य नाही,’ अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली.
भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फेजकातवाडी (ता. सातारा) येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, डॉ. विनायक पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत भाई कैद्य यांना फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णू वाघ यांना जीवन गौरवपुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिजाताई राठोड यांना फुले आंबेडकर युवा साहित्य पुरस्कार देण्यात आला. अजित भिलारे, अरुण ननाकरे, लक्ष्मण ढोणे यांनाही गौरविण्यात आले. संसदीय कार्याची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.
शरद पवार म्हणाले, मांस वाहतूक करणार्‍या वाहनांकर धावून जाणारे तथाकथित गोरक्षक आणि त्यांना पाठिशी घालून संरक्षण देणारे राज्यसत्तेतील काही घटक अशी विचित्र परिस्थिती आज देशात पाहायला मिळते आहे. वाहनातून नेण्यात येणारे मांस हे गाईचेच आहे, असा आरोप करुन वाहन चालकांना वेठीस धरले जाते. मात्र विचारांकर उभी राहिलेली सामुहिक शक्ती अशा प्रकारांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सर्क लहान व अल्पसंख्यांक घटकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. यातून देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण माने यांनी उपेक्षित समाजाला पुढे घेऊन जाण्याची खबरदारी घेतली. त्यांच्याकरच चुकीचे आरोप झाले. मात्र, न्यायालयाने त्यांना न्याय दिला, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
देशातील 826 भटक्या जमातींवर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. 11 कोटी जनता ही भटक्या जमातीत मोडते, असे रेणके आयोगाने स्पष्ट केले आहे. याच भटक्या लोकांना एकत्र करण्याचे मोठे कार्य रामनाथ चव्हाण या व्यक्तिने केले. वंचितांचे हितकर्ते असणार्‍या रामनाथ चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची आठवण झाली, असे भाई वैद्य यांनी सांगितले.