कन्यागत महापर्वकाळानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगली, दि. 05 - नागठाणे (ता. पलूस) येथे आयोजित कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने जीवनकिरण फाऊंडेशन नागठाणे व संत निरंकारी मंडळ यांच्यावतीने नागठाणे ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात 110 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पलूस पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सीमा मांगलेकर यांच्याहस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास नागठाणे गावच्या सरपंच श्रीमती माधुरी जोशी व उपसरपंच भरत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या सर्व रक्तदात्यांचे ऍपद्वारे रजिस्टर करण्यात आले आहे. त्यासाठी डॉ. शीतल साळे, श्रीमती आशा आदाटे, चंद्रकांत बजबळे व प्रभाकर वाले यांनी विशेष प्रयत्न केले.
या कन्यागत महापर्वकाळानिमित्त वासुदेव शास्त्री यांचे नारदीय कीर्तनही मुख्य मंडपात पार पडले. राज्यस्तरिय कृष्णाकाठ महोत्सवानिमित्त आयोजित कृषी व पशु- पक्षी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात प्रा. अस्लम फकीर यांचे संस्काराचे सामर्थ्य या विषयावर व्याख्यान झाले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात सकाळी नऊ ते एक या वेळेत सात दाम्पत्यांनी सामुदायिक गंगापूजन केले.
दुपारी ब्रम्हचैतन्य भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्री 108 नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज आदिमठ संस्थान धारेश्वर यांचे प्रवचन झाले. सायंकाळी महाआरती व अष्टावधान सेवा पार पडली. कृषी प्रदर्शनात एक टन वजनाचा बैल प्रमुख आकर्षण ठरला आहे. या कन्यागत महापर्वकाळाच्या यशस्वीतेसाठी सुहास पाटील, आनंदराव अडिसरे, भारतीय जनता पक्षाचे पलूस तालुका अध्यक्ष विजय पाटील, अशोक पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपतराव पाटील, हिम्मत पाटील, किरण शिंदे, आनंदा कोरे व धनाजी पाटील आदी विशेष परिश्रम घेत आहेत.