सांगली जिल्ह्यात साडे सात लाख वृक्षांची लागवड करणार- जिल्हाधिकारी शेखर गायकवाड
सांगली, दि. 05 - महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै महिन्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून या उपक्रमातर्ंगत सांगली जिल्ह्यात सात लाख 55 हजार वृक्षांची दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत लागवड करण्यात येणार आहे. हे वृक्ष 100 टक्के जगविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागप्रमुख यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित बैठकीत शेखर गायकवाड बोलत होते. या बैठकीस सांगली जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी व सांगली जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक आर. एस. पुजारी आदी उपस्थित होते.
गतवर्षी सांगली जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यापुढील कालावधीतही वृक्ष लागवडीसाठी सर्व विभाग यात योगदान देऊन वृक्ष लागवडीचे अभियान यशस्वी करतील. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व विभागांनी जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अधिकारी- कर्मचार्यांची नियुक्ती करावी. दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. रोपांची आवश्यकतेनुसार उपलब्धता वन विभाग करणार आहे. दि. 25 व 26 जून रोजी सांगली जिल्ह्यात वन विभागाच्या चित्ररथाचे आगमन होणार असून हा चित्ररथ दोन दिवस वृक्ष लागवडीबाबत प्रबोधन करणार आहे.
यावर्षीसाठी सांगली जिल्ह्याला सात लाख 55 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यात वन विभागाला साडे तीन लाख, तर सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दोन लाख 55 हजार व इतर विभागांना एक लाख 65 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. संबंधित विभागांनी पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवडीसाठी खड्डे काढून तयार ठेवावेत, अशी सूचनाही शेखर गायकवाड यांनी केली आहे.