बिल असो नसो पैसे तर द्यावेच लागतील...!
दे.मही येथिल विद्युत महावितरण कर्मचार्यांच्या दादागिरीला जनता त्रस्त...!
बुलडाणा, दि. 10 - दे.राजा, देऊळगाव मही, विभागातील महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून ग्राहकांना मीटर रिडींग न घेता अवाजवी बिले पाठविली जात आहेत. महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करून वीज बिलात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी वीज ग्राहकाच्या वतीने करण्यात येत आहे.परीसरात वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यात ठेकेदारांचा व कर्मचारायांचा मनमानी कारभार, मगरूरपणा, उद्धटपणा वाढत आहे. मीटरचे रिडींग वेळेवर घेतले जात नाही. अनेक बिलांवर मीटर रिडींगचा फोटा येत नाही, कधी मीटर चालू असताना मीटर फॉल्टी दाखविले जाते. कधी चुकिच्या पद्धतीने मीटरचा फोटो काढल्यामुळे रिडींग स्पष्ट दिसत नाही. यामुळे ग्राहकाला जास्तीचे बील पाठविले जाते. तसेच वीज बिले वेळेवर पाठविली जात नाही. त्यामुळे वीज ग्राहकांना नाहक दंड भरावा लागतो. ग्राहकाला वीज बिले 20 दिवसा आधी मिळावे. अधिकारी व कर्मचार्यांना ग्राहकांना चांगली वागणूक मिळत नाही, नियमापेक्षा जास्त भारनियमन केले जाते, ग्राहकांनी तक्रार देण्यासाठी संपर्क केला असता कर्मचार्यांकडून फोन उचलला जात नाहि. तसेच वीज ग्राहकांना कोणत्याही प्रकारची (डिस्कनेक्शन) नोटीस न देता विद्युत पुरावठा खंडित करण्यात येते आहे. विद्युत अधिनियम कलम 56 प्रमाणे बिल थकीत असलेल्या ग्राहकाला वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक असून सुद्धा हे सर्व नियमाला कचर्याची टोपली ह्या कर्मचार्यांनी दाखवली आहे. ग्राहकाला वीज बिल मिळालेले असो नसो परंतु पैसे तर द्यावेच लागतील अशी विद्युत वितरण कर्मचार्यांच्या दादागिरीला जनता त्रस्त झाली आहे. विद्युत वितरण कर्मचार्यांच्या ह्या दादागिरीला वरिष्ठांनी रोख लावावा अन्यथा होणार्या परिणाम वाईट होतील एवढं मात्र नक्की.
