माण-खटावमधील कामांसाठी 1 कोटीचा विकास निधी : खा. पवार
दहिवडी, दि. 10 (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील बिदालच्या ग्रामस्थांची श्रमदानाची तयारी व एकी पाहून गावाीील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असून कायमस्वरूपी दुष्काळी माण-खटावच्या कामांसाठी एक कोटीचा विकासनिधी खा. शरद पवार यांनी जाहीर केला. दरम्यान, बिदाल येथे सगळे गाव जलसंधारणाच्या कामावर उत्स्फूर्तपणे येत असल्याबद्दल खा. शरद पवार अचंबित झाले. श्रमसंस्कृतीच्या या वारकर्यांचा खा. शरद पवार यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन गौरव केला.
माण तालुक्यातील बिदाल येथे वॉटर कप स्पर्धेच्या कामाच्या पाहणीसाठी खा. शरद पवार आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुभाषराव शिंदे, ज्येष्ठ नेते वाघोजीराव पोळ, पंचायत समिती सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे, म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनगराध्यक्षा सौ. सूर्यवंशी उपस्थित होते. खा. शरद पवार यांनी सोमवारी सकाळी बिदाल गावाला भेट देऊन नालाबांध, जमिनीच्या बांधबंदिस्तीच्या कामांची पाहणी करून कामावरील महिलांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांशी चर्चा करून गावात सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी बिदाल गावातील सुरु असलेल्या कामांची रुपरेषा सांगितली.
त्यांनतर खा. शरद पवार म्हणाले, मी अनेकवेळा माण-खटावचा दुष्काळ पाहिलाय. अनेक वर्षे माण तालुका दुष्काळाशी संघर्ष करतोय. दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करताना शिक्षणाचे महत्व पटल्याने तालुक्यातून अनेक अधिकारी घडतायेत. अनेक क्षेत्रात माणदेशी माणूस चमकतोय. याउलट आमच्याकडे बागायती पट्ट्यांमुळे शिक्षण कमी घेतले जाते. लोक आमच्याकडे सभापती करा, हे करा ते करा, पदे मागण्यासाठी येतात हा फरक आहे. दुष्काळी माणमध्ये अवकृपेतून चांगले घडत आहे. सरकारने काय देण्यापेक्षा स्वत:च लोक जिद्दीने काम करत आहेत, हे चांगले लक्षण आहे.
बिदाल गावचे वॉटर कप स्पर्धेतील काम राज्यात आदर्शवत आहे. आम्हीही बंधार्याची कामे केली. परंतू लोकांनी पुढे होऊन श्रमदानातून कामे केल्यामुळे कामाचे मोल लोकांना कळले. माणमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिहे-कठापूर व उरमोडीची कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत आमदार गोरे यांनी व्यक्त केले. वॉटरकप स्पर्धेचे तालुका समन्वयक अजित पवार यांनी तालुक्यातील 32 गावांच्या कामांची माहिती दिली. आरटीओ गजानन ठोंबरे यांनी बिदाल गावच्या विकासाचा आराखडा खा. शरद पवार यांना दाखवला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य भारती पोळ, पंचायत समितीच्या सदस्य अर्पणा भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सौ. सुरेखा माने, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.