भारतीय लष्कराकडून ‘मिनी हवाई दला’ची मागणी
नवी दिल्ली, दि. 21 - आम्हाला स्वत:चे मिनी हवाई दल उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय लष्कराकडून पुन्हा करण्यात आली आहे . लष्कराकडून करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात येत्या शनिवारी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यावेळी लष्कराच्या या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी भारतीय लष्कराच्या या मागणीला भारतीय हवाई दलाने विरोध केला होता. भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात लढाऊ हेलिकॉप्टरच्या तीन तुकड्या सुरु करण्याची मागणी केली आहे.
आम्हाला 11 लढाऊ अपाची हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी परवानगी द्या असे लष्कराने केंद्र सरकारला सांगितले आहे. सरकारने हवाई दलासाठी अशा 22 लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे. हा करार 13 हजार 952 कोटी रुपयांमध्ये करण्यात आला. भारतीय हवाई दलाला जुलै 2019 पासून 22 अपाची हेलिकॉप्टर्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.