Breaking News

आता टेक महिंद्रामध्येही कर्मचारी कपात

नवी दिल्ली, दि. 12 -विप्रो, कॉग्निझंट आणि इन्फोसिस या मोहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्यानंतर आता टेक महिंद्रानेही आपल्या तब्बल 1500 कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. 
मार्च महिना उलटून गेल्याने सध्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या वार्षिक बढतीची प्रक्रिया सुरू आहे. ही दैनंदिन प्रक्रिया असल्याचा दावा केला जात आहे. अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे कर्मचार्‍यांची कपात केली जात आहे. यातील अनेक कर्मचार्‍यांनी आता नोकरी वाचवण्यासाठी सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. या कंपन्यांमधील कर्मचार्‍यांची संघटना असलेल्या ‘एफआयटीई’ने यासंदर्भात चेन्नई आणि हैदराबाद येथील कामगार आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. यामध्ये कर्नाटक आणि कोईम्बतूरमधील कंपन्यांकडून तडकाफडकी करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीवर आक्षेप घेण्यात आला आहे. कॉग्निझंट कंपनीने तात्काळ केलेली कर्मचार्‍यांची कपात ही बेकायदा आहे. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी या संघटनेने या याचिकेत केली आहे.