भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या वाढत्या वेगामुळे चीन चिंतीत
नवी दिल्ली, दि. 12 - भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चीन स्वत:च्या अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत समाधानी राहू शकत नाही,’ असे चीन सरकारच्या मुखपत्द करण्यात आले आहे. ‘भारत सरकार जर चीनच्या संकल्पनेची नक्कल करत असेल तर जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाईल. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यास चीनला ते परवडण्यासारखे नाही,’ असा इशारा देणारा लेख चीनच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पाहता चीनला सावधतेचा इशारा यावेळी देण्यात आला असून ‘भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे चीनने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच ‘चीनमधील श्रमशक्ती वेगाने कमी होते आहे. भारताची स्थिती चीनच्या अगदी उलट आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. यातील अधिक लोकसंख्येचे वयोमान 25 वर्षांपेक्षा कमी आहे, असेही यात नमूद केले आहे.
भारतातील सौरऊर्जा क्षेत्रदेखील वेगाने विस्तारत आहे, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे .