Breaking News

संग्रामपूर केंद्रावरील तुर खरेदी गैरव्यवहार चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी

बुलडाणा, दि. 30 - संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीचे संचालक मोहन खंडेराव यांनी आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत तुर खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने सहायक निबंधक सहकारी संस्था, जळगाव जामोद यांच्याकडे चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदवाढ मागितली आहे.  
सदर अहवाल हा तुर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेट घेवून 11 मे रोजी कार्यालयात हजर राहून चौकशी करण्यासाठी रेकॉर्ड देण्याचे कबूल केले असता काही प्रमाणात रेकॉर्ड दिले. परंतु काही रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ केली. पथक प्रमुखांनी वेळोवेळी रेकॉर्डची मागणी केली असता न दिल्याने संतप्त होवून केंद्रावरील सर्व संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे बजावले असता प्रभारी व्यवस्थापकाने सांगितले की, संस्थेकडे नियमित व्यवस्थापक नसल्याने तुर केंद्रावर खरेदी केलेला बराच माल पडून असून तो गोदामात पाठविण्यासाठी शेतकर्‍यांना रकमेचे धनादेश इतर माहिती देणे, दैनंदिन कामकाज करणे, तसेच संस्थेमध्ये पुरेशे कर्मचारी नसल्याने रेकॉर्ड उपलब्ध करुन देवू शकत नाही, असे सांगण्यात आले. म्हणून या केंद्रावर तुर खरेदी केलेल्या शेतकर्‍यांचे सातबारा मिळाले नाहीत. तुर खरेदी करताना बाजार समितीने शेतकर्‍यांना दिलेले टोकन हे 1665 आहेत. परंतु 916 इतकेच टोकन देण्यात आले. उर्वरित 749 टोकन दिले नाहीत. तुर खरेदीच्या धारिकेत 16 जानेवारी ते 21 एप्रिल पर्यंतच्याच अहवालाच्या प्रति दिल्या. तुरीच्या रकमेचे चेक संबंधिची माहिती 31 मार्च पर्यंतचीच आहे. म्हणून अपूर्ण रेकॉर्ड मिळाल्यामुळे तपासणी पथकास कार्यालयीन दैनंदिन कामकाज केेंद्रावरील तुर खरेदीची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने सदर तक्रारीची चौकशी करण्यासाठी अंदाजे एक महिना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने तुर संबंधीची माहिती गोळा करण्यात येत आहे. गोदाम काटापट्टीनुसार तुर फरकाची 90 टक्के तपासणी करुन संगणकावर तयार करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण आवश्यक मुद्दे व रेकॉर्ड तपासणी करणे गरजेचे असल्याने चौकशी करण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा, तसेच तुर खरेदी बाबतचे संपूर्ण रेकॉर्ड संस्थेने उपलब्ध करुन देण्याचे आदेश संस्थेने द्यावेत, अशी मागणी एस.आय.राजपूत तपासणी पथकप्रमुख तथा सहकार अधिकारी श्रेणी-1 सहकारी संस्था, संग्रामपूर व एस.सी.अग्रवाल तपासणी पथक सहायक तथा सहकार अधिकारी श्रेणी-2 अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव जामोद यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव जामोद यांच्याकडे केली आहे.