Breaking News

दुसरबीड येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 20 जोडप्यांचे झाले ‘शुभमंगल’

बुलडाणा, दि. 30 - शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या हेतूने लग्नसमारंभात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी कर्तव्य फाऊंडेशन आणि विनोद वाघ मित्र मंडळाच्या वतीने दुसरबीड येथे 28 मे रोजी पार पडलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 20 जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. यामध्ये 9 बौद्धधर्मीय तर 11 हिंदुधर्मीय जोडप्यांचा समावेश आहे. या विवाह सोहळयाला सिने अभिनेत्री तेजा देवकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे तर प्रमुख उपस्थिती आ. संजय कुटे, जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, जि.प. सदस्या सरस्वती वाघ, राजेंद्र काळे, पं.स. सभापती राजेश ठोके, सदस्य युवराज नागरे, श्याम जाधव, संतोष आडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे, तालुकाध्यक्ष नितीन देशमुख, सुभाष घिके, प्रकाश सोनी, राजू कायस्थ यांची उपस्थिती होती. यावेळी वधुवरांना आशिर्वाद देताना आ. संजय कुटे यांनी, सामूहिक विवाह सोहळा लोप पावत चालला असून विनोद वाघ यांनी हा सामूहिक सोहळा आयोजित करून या संकल्पनेला नवचैतन्य प्राप्त करून दिले आहे. श्रम वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे आ. कुटे यांनी सांगितले.
कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद वाघ यांनी प्रास्ताविकात, शासकीय अनुदान न घेता सामाजिक दायित्व म्हणून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचे सांगितले.जि.प.अध्यक्ष उमाताई तायडे यांनी, याविवाह सोहळ्यात 20 मुलींचे कन्यादानाचे दायित्व स्विकारून सोहळ्याच्या माध्यमातून विनोद वाघ यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. धृपतराव सावळे यांनीही शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सामूहिक विवाह काळाची गरज असल्याचे सांगितले. तेजा देवकर यांनी, मला या विवाह सोहळ्यात येण्याचे भाग्य मिळाल्याचे नमुद केले.  यावेळी वधुरांना मनी मंगलसूत्र आणि संसार उपयोगी भांडे वाटप करण्यात आले. आयोजनासाठी राजू कायस्थ, अशोक नागरे, विलास आघाव, छगन खंदारे, राजू गुंजाळ, प्रसाद कुळकर्णी, विष्णू घुगे, रामेश्‍वर काळुसे, गणेश सानप, गजानन फड, दिलीप काळे, लखन देशमुख, विष्णू घुगे, दीपक घुगे, गजानन बुधवत, प्रभाकर वखरे, वैभव देशमुख, जी.एस. देशमुख, नंदकिशोर देशमुख, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, देवा सानप आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.