Breaking News

मांगोणे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी गरजूंना मिळाले हक्काचे घरकूल

नाशिक, दि. 27 - पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत 64 कुटुंबांना हक्काचे घर  मिळाले आहे. नाशिकर्गावरील करंजाळीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात एकूण 33065 टक्के कुटुंब भूमिहीन असल्याने तुटपुंजा  कमाईतून घराचे स्वप्न साकार करणे त्यांना शक्य नव्हते.
हंगाम संपल्यावर मंजुरीसाठी भटकंती ठरलेली आणि त्यामुळे स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक दिपक कोतवाल यांनी  गटविकास अधिकारी बी.बी.बहिरम यांच्या सहकार्याने गावकर्‍यांच्या मनात घराविषयी आशा निर्माण केली आणि अनेकांचे घराचे स्वप्न इंदिरा आवास योजनेच्या  माध्यमातून पुर्णदेखील केले.
गावातील गरीब नागरिकांची घरे मातीची, प्लॅस्टीकचे आच्छादन असलेली आणि काही ठिकाणी जुन्या कौलांची होतीळा आला की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे  लागे. तात्पुरती डागडुजी करून दिवस पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. शासकीय योजना तर होती मात्र अंमलबजावणीत अडचणी होत्या. कोतवाल यांनी पुढाकार  घेऊन ग्रामसभेत अडचणींवर चर्चा केली.
वीटांची समस्या दूर करण्यासाठी काही लाभार्थ्यांनी शेतात वीटभट्टी तयार केली. सरपंच उषाताई गवळी यांनी दुकानदारांना विनंती करून उधारीवर सिमेंट मिळवून  दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने मजुरी केल्यास त्याला 18 हजारापर्यंत मजुरी देण्यात आली. त्यामुळे मजुरी आणि घर असा दुहेरी लाभ  त्याला झाला. गावातील अकुशल मजुरांना रोजगार मिळण्याबरोबर रोहयो अंतर्गत 5 हजार 660मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला.
गावात शबरी आवास योजनेअंतर्गत तीन घरांचे बांधकाम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक घराचे बांधकाम सुरू आहे. गावात पक्की घरे आणि समोर  सिमेंटचे रस्ते यामुळे गावातील राहणीमानही बदललेले चटकन जाणवते ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान या योजनेचे महत्व अधोरेखित करणारे आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत काम सुरू करताना 35 हजार, पायाचे बांधकाम झाल्यावर 35 हजार, आणि काम पूर्ण झाल्यावर 25 हजार असे तीन टप्प्यात  अनुदानाची रक्कम देण्यात आली. लाभार्थ्याचा हिस्सा केवळ 5 हजार होता. त्याला साधारण मिळालेली मजुरी लक्षात घेता एक लाख 18 हजारात पक्के घर तयार  झाले.