Breaking News

3 जूनपासून बोरीवली रेल्वेस्थानकाचे फलाट क्रमांक बदलणार !

मुंबई, दि. 27 - पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला असून 3 जूनच्या मध्यरात्रीपासून नवीन फलाट क्रमांक  अमलात आणले जाणार आहेत. हे क्रमांक बदलताना पश्‍चिमेकडून पूर्वेकडे अशा दिशेने बदलण्यात येणार आहेत. बोरिवली स्थानकावर नव्याने काही फलाट बांधण्यात  आल्याने गाड्यांची वाहतूक एकसमान होत नव्हती. तसेच फलाट क्रमांक 6 आणि 6ए मध्ये प्रवाशांचा गोंधळ होत असे. याच कारणास्तवर प्रवाशांच्या सोयीसाठी  फलाटांच्या क्रमांकांची पुर्नरचना करण्यात येत असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाटकर यांनी सांगितले.