Breaking News

हरियाणात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

नवी दिल्ली, दि, 04 - हरियाणामधील सोनीपत येथील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. वीरेंद्र रोस असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे असून त्यांनी फाशी घेऊन स्वत:जवळ असलेल्या पिस्तुलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 
आत्महत्या करण्यापूर्वी वीरेंद्र यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. एका किरकोळ कारणावरून वीरेंद्र यांनी माजी नगरसेवक विमल किशोर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर किशोर हे वीरेंद्र यांच्यावर दबाव टाकत होते. याबाबतची माहिती आपण पोलीस अधीक्षक अश्‍विन शेनवी यांना दिली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. आपल्याला न्याय न मिळाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.