Breaking News

केंद्र सरकारने एअर इंडियाचे 451 कोटी रूपये थकवले

नवी दिल्ली, दि. 12 - केंद्र सरकारने एअर इंडियाचे 451.75 कोटी रूपये थकवल्याचे वृत्त मिळत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पुरवण्यात आलेल्या विमानांचा खर्च केंद्र सरकाराने अद्याप एअर इंडियाला दिला नाही.
नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी अनेकदा पत्र पाठवून एअर इंडियाचे थकित रक्कम भरण्यास सांगितले होते. 2014 ते 2017 या कालावधीत मंत्रालयाच्या अधिका-यांनी विविध मंत्रालयांना 31 पत्र पाठवून एअर इंडियाचे थकित रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यांसाठी बोईंग 747-400 विमाने तयार ठेवण्यात येतात. तसेच अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाच्या विमानाचा वापर केला जातो.