सोशल मिडीयावर पंतप्रधान मोदीच अव्वल; ट्रंप यांना टाकले मागे
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फेसबुक, ट्विटर यासांरख्या सोशल मिडीयाच्या माध्यमांवर पंतप्रधान मोदी यांनाच सर्वाधिक चाहते असल्याचे दिसून आले आहे . पंतप्रधान मोदी यांना अनेक चाहत्यांनी फॉलो केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनाही पंतप्रधान मोदी यांनी मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारी कामकाज संदर्भातील फेसबुकचे पेजही तिस-या क्रमांकावर आहे.
पंतप्रधान मोदी यांना फेसबुकवर 4 कोटी 19 हजार लाईक्स मिळाले असून ते यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर 2 कोटी 22 लाईक्ससह डोनाल्ड ट्रंप हे दुस-या क्रमांकावर आहेत. तर, 1कोटी 35 हजार लाईक्ससह पीएमओ इंडियाचे अधिकृत पेज तिस-या क्रमांकावर आहे.
मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाहणी करण्यात आली. त्यातही पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असल्याचे दिसून येते आहे.