Breaking News

मुंबई, पंजाब आणि राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा

नवी दिल्ली, दि. 28 - दिल्ली, मुंबई , पंजाब आणि राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. हा हल्ला लष्कर-ए-तोयबाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या इशार्‍यामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 
लष्कर-ए-तोयबा संघटनेचे 20 ते 21 दहशतवादी घुसले आहेत, असे गुप्तचर यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. हा हल्ला मेट्रो, रेल्वे स्थानक, विमानतळे, हॉटेल्स, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळ आणि मैदाने येथे होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.