Breaking News

बलात्काराच्या घटनांचे वृत्तांकन तपशीलवार देणे माध्यमांनी थांबवावे - मनेका गांधी

नवी दिल्ली, दि. 28 - बलात्काराच्या घटनांचे वृत्तांकन तपशीलवार देणे माध्यमांनी थांबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेबाबत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, बलात्कारासारख्या घटनांचे वृत्तांकन माध्यमांनी थांबवायला हवे. तसेच काही माध्यमे बातम्या खूप रंगवून लोकांसमोर सादर करतात. त्यामुळे या बातम्यांवर लोकांकडून जास्त लक्ष दिले जाते. गुन्ह्याच्या बाबतीत भारतातील महिलांची परिस्थिती वाईट आहे. दुस-या देशांत असे केले जात नाही. विनयभंगाच्या किंवा बलात्काराच्या बातम्या तेथील माध्यमे दाखवत नाहीत. आपल्या देशातील माध्यमाद्वारे प्रत्येक बलात्काराच्या बातम्यांचे वृतांकन केले जाते. हे योग्य नाही त्यामुळे माध्यमांनी अशाप्रकारच्या घटनांचे वृत्तांकन थांबवावे, असे त्यांनी नमूद केले आहे.