पुरातत्त्व विभाग करणारा सुवर्णदुर्ग किल्ल्याची डागडुजी
रत्नागिरी, दि. 04 - दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग या दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या किल्ल्याच्या डागडुजीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. दगडी भिंतींवर वाढणार्या पिंपळसदृश झाडांमुळे या किल्ल्याची मोठी हानी झाल्याने ही झाडे मुळासकट काढून भिंतीला अनुरूप दगडांनी पुनर्बांधकाम आता करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यात पुरातत्त्व विभागातर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्याची नुकतीच सांगता झाली. पुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ‘स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत’अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथे 16 एप्रिल रोजी करण्यात आला होता. त्यानंतर 30 एप्रिल रोजी हर्णै येथे सुवर्णदुर्ग या समुद्रातील किल्ल्यात त्याची सांगता करण्यात आली. यावेळी पुरातत्त्व विभागाने हा संकल्प जाहीर केला. येत्या पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत पुरातत्त्व विभागाकडून सुवर्णदुर्ग किल्ल्यात पर्यटकांनी टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्याची प्लास्टिकची पाकिटे तसेच अन्य कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच किल्ल्याच्या आत वाढलेली झाडी, गवत कापून किल्ला पर्यटकांना फिरण्याकरिता स्वच्छ करण्यात आला. याबरोबरच किल्ल्याच्या तटांवर वाढलेली पिंपळ व वडसदृश झाडे तोडण्यात आली. यापुढे या झाडांची खोलवर गेलेली मुळे काढून ती झाडे पुन्हा वाढणार नाहीत, अशी मोहीम पुरातत्त्व विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. या झाडांमुळे किल्ल्याच्या तटांना अनेक ठिकाणी हानी पोहोचली आहे. यामुळे या बुरुजांच्या पुनर्बांधणीचे कामदेखील पुरातत्त्व विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सुवर्णदुर्ग किल्ल्याला खर्या अर्थाने नवीन रूप प्राप्त होणार आहे.
अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे दगड डेक्कन लॅटराइट या प्रकारचे आहेत. हे दगड जमिनीत कोकणातील दगड खाणींमध्ये सहजा सहजी सापडत नाही. यामुळे आता या किल्ल्याच्या बुरुजांच्या पुनर्बांधणीकरिता आवश्यक असणारा दगड जिल्ह्याच्या बाहेरून आणण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून ते वाळूपर्यंत पर्यटकांच्या सोयीकरिता पक्क्या स्वरूपाच्या पायर्या व स्वच्छतागृहदेखील बांधण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. यापुढे किल्ल्याच्या देखरेखीकरिता व दररोज किल्ल्याच्या देखभालीकरिता किल्ल्यात 24 तास राहणार्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचाही मानस आहे. यामुळे किल्ल्याची दररोज स्वच्छता राखली जाईल, अशी माहिती पुरातत्त्व विभाग उपमंडळाचे संवर्धन सहायक राजेश दिवेकर व त्यांचे सहायक हिंमत जाधव यांनी दिली.