Breaking News

पीएमपीच्या उत्पन्नात वाढ

पुणे, दि. 07 - पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकारा यांनी पीएमपीच्या चालक-वाहकांमध्ये नवी कार्यसंस्कृती निर्माण केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू  लागले आहेत. सध्या पीएमपीच्या अधिकाधिक गाडया मार्गावर धावत असल्याने पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
घटती प्रवासी संख्या, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, तुटलेले बाक, वेळेवर मार्गावर न धावणार्‍या गाडया, किरकोळ साहित्याअभावी दुरुस्त न होणार्‍या गाडया हे  चित्र आता बदलले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील सुमारे बारा लाख प्रवाशांना सेवा देणार्‍या पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय  संचालक पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर पीएमपी प्रवासी केंद्रित झाली आहे.
गाडयांची संख्या वाढल्यामुळे उत्पन्नातही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2015 मध्ये महिन्याचे उत्पन्न 42 कोटी 34 लाख एवढे होते. एप्रिल 2016 मध्ये ते  घटून 41 कोटी 81 लाख असे झाले. मात्र एप्रिल 2017 मध्ये ते 43 कोटी 27 लाखांपर्यंत पोहोचले. त्यामुळे उत्पन्नातही सुमारे दीड कोटी रुपयांची वाढ झाली  आहे.