Breaking News

माढा तालुक्यात शेतकर्‍याची आत्महत्या

माढा, दि. 07 - नापिकीमुळे नैराश्यापोटी माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) येथील शेतकर्‍याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.जालिंदर महादेव सुतार (वय 49) असे आत्महत्या केलेल्या त्याचे नाव आहे.
जालिंदर सुतार यांची सापटणे (भोसे) येथे दीड एकर शेती आहे. यात त्यांनी भूईमुग कडवळाची लागवड केली होती. मात्र, पाण्याचा अभाव आणि वाढत्या  उन्हाच्या झळा यामुळे ती जळाली. त्यामुळे जालिंदर हे निराश होते. त्यातच त्यांनी घराशेजारील विहिरीजवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन  जीवनयात्रा संपवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुतार यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार  आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पांडुरंग सुतार यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक फौजदार मारुती लोंढे तपास करत आहेत. शुक्रवारी  बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी सुतार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.