तब्बल सव्वा दोन लाख रुपये शुल्क अर्धा तासात वसूल
सातारा, दि. 07 - सातारा बस स्थानकानजीक कोट्यवधी रुपये खर्चकरुन दहा वर्षापूवर्वी छत्रपती शाहू क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. पहाटे सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत विविध क्रीडा प्रकाराचा सराव करण्यासाठी सातारकर याठिकाणी येतात. परंतू काही महाभाग कोणतेही शुल्क न भरता त्याचा उपभोग घेतात. त्याचे प्रमाण वाढल्यामुळे काल सायंकाळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी स्वत: प्रवेशद्वारात उभे राहून तपासणी केली असता अनेकजण विनाशुल्क स्टेडियममध्ये खेळाच्या सरावासाठी येत असल्याचे उघड झाले. आवो-जाओ घर तुम्हारा, या प्रवृत्तीला चाप लावून तब्बल सव्वा दोन लाख रुपये शुल्क अर्धा तासात वसूल करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, सातारा शहराच्या वैभवात भर घालणार्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. याठिकाणी सुसज्ज मैदान, व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव, बेडिंमटन कोर्ट, व्हॉलीबॉल, क्रिकेटचा सराव, बास्केटबॉल तसेच बॉक्सिंग रिंग उभारण्यातआले. पहाटे सहा वाजल्यापासून चालणे-धावणे व इतर व्यायामाच्या प्रकारासाठी सुमारे दोन हजार खेळाडूंसह बालचमू व ज्येष्ठ नागरिक याठिकाणी येत असतात. त्यांना अधिकृत अर्जव शुल्क भरल्यानंतर स्टेडियममध्ये प्रवेश दिला जातो. काही प्रामाणिक पालक तसेच प्रितष्ठीत नागिरक विशेषत: श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्यासारखी व्यक्ती दरवर्षी नियिमतपणे शुल्क भरुन या संकुलाचा वापर करतात. या शुल्कामधूनच संकुलाची देखभाल-दुरुस्ती केली जाते. पण अलीकडच्या दोन-चार वर्षात अनेक राजकीय गटांनी तसेच काही उद्योजकांनी विनाशुल्क या संकुलाचावापर करुन फुकटचा आस्वाद घेतला. त्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे याठिकाणी शिबीराच्या नावाने येणार्या काहींनी शुल्क न भरताच त्याचा वापर केला. ही बाब जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांना समजताच त्यांनी काल अचानक सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रवेशद्वारात उभे राहून प्रवेशपत्र व ओळखपत्रांची तपासणी केली. त्यावेळी शिबीराच्या आयोजकांनी कार्यालयात 2 लाख 28 हजार 950 रुपये एवढी रक्कम जमा न केल्याचे उघड झाले. ही रक्कमतातडीने जमा केल्यानंतर शिबिरार्थींना संकुलात सोडण्यात आले.
या संकुलामध्ये काही खासगी संस्था विविध क्रीडा प्रकार व शिबीराचे आयोजन करतात. त्यामुळे पालकांना शुल्क भरुनच प्रवेश दिला जातो. पण हे शुल्क न भरता स्वत:चे खिशे भरणार्या या प्रवृत्तीला जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी लगामघातला आहे. या संकुलाच्या बाहेरच क्रीडा साहित्य विकणारी दुकाने आहेत. याठिकाणी बाजार भावापेक्षा जास्त किंमतीत पोहण्याचे साहित्य मिळते. त्याबाबतही पालकांनी तक्रार केली. वाजवी दरात साहित्य उपलब्ध करण्यासाठी क्रीडा अधिका-यांनीच या संकुलात ना नफा, ना तोटा तत्वावर खेळाडूंसाठी साहित्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, क्रीडा अधिका-यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत असले तरी क्रीडा अधिकार्यांना प्रवेशद्वाराजवळ उभे राहण्याची वेळ का आली ? असा मार्मिक प्रश्न क्रीडा रसिकांनी उपस्थित केला आहे.