स्वाइन फ्लूमुळे मृतांचा आकडा 47 वर
पुणे, दि. 07 - पुणे शहरात स्वाइन फ्लूने आज आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात 1 जानेवारी ते 6 मे या कालावधीत स्वाइन फ्लूमुळे मृतांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. यामध्ये 15 रुग्ण हे पुण्यातील तर 32 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. तर आणखी 23 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. खडकी आणि बिववेवाडी येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील 38 वर्षीय पुरुषाला 5 मे रोजी तर 50 वर्षीय व्यक्तीला 21 एप्रिल रोजी स्वाइन फ्लूची लागन झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर दोघांवरही स्वाइन फ्लूचे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
