प्रधानमंत्री उज्वला योजनाग्रामीण महिलांसाठी फायदेशीर- होडगर
संगमनेर, दि. 09 - गरीब महिलासाठी उज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळे या महिलाच्या अडचणी कमी होत महिलाचे आरोग्य सुधारण्यास यामुळे मदत मिळणार असल्याने हि योजना महिलानसाठी फायदेशीर आहे. या योजनेसाठी आपण सर्वानी पतंप्रधान नरेद्रं मोदी याचे आभार मानले पाहिजे. असे गौरवउद्गार मांची हिल शैक्षणिक सकुंलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे आयोजित प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत परिसरातील सुमारे 185 गरजु महीलांना एलपीजी गॅस वितरण कार्यक्रम पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आश्वी ग्रामपचांयत सदंस्य विजयराव हिंगे, भाऊसाहेब गायकवाड, बाळकृष्ण होडगर, आबासाहेब राखपसरे, सतिषराव गोडंगे, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत कोळपकर, माऊली गॅसचे वितरक नवले, अँड. स्मिता कोळपकर, अनिल राखपसरे, मंच्छिद्र होडगर, राहुल जर्हाड, जगन्नाथ हिंगे, संतोष ताजणे, सिताराम गायकवाड, अमोल राखपसरे आदि मान्यवर उपस्थित होते.
होडगर पुढे म्हणाले, ग्रामिण भागातील दारिद्रं रेषेखालील कुटुंबातील महिलाना गरीबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व पालनपोषण करण्यासाठी अतिशय तुटंपुज्या मजुंरीवर काम करावे लागत आहे. महागाईचे चटके सोसत असताना गॅस घेणे हे या कुटुंबाच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या महिलाना मातीच्या अथवा तीन दगडाच्या चुलीवर स्वंयपाक कारावा लागतो. चुलीवर स्वंयपाक करताना धुरामुळे महिलाचे आरोग्य धोक्यात येत आले आहे. उज्वला गॅस योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा ‘मिळणार आहे.
विजय हिंगे म्हणाले, आ. थोरात संगमनेर तालुक्यात सातत्याने गोरगरीबांसाठी विविध योजना राबवत आहेत. आश्वीसह परिसरातील उंबरी-बाळापूर, दाढ, खळी आदि गावातील दारिद्रं रेषेखालील सुमारे 185 लाभांर्थी गरीब कष्टकरी महिलाना मान्यवराच्या हस्ते एलपीजी गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले आहे. या महिलाची धुरापासून सूटका झाल्याने या महिलाच्या चेहर्यावरील आनंद यावेळी ओसडून वाहत होता.