Breaking News

संगमनेरात आर्ट ऑफ लिविंग हॅप्पीनेस कोर्सचे आयेजन

संगमनेर, दि. 09 - योग म्हणजे फक्त आसन-प्राणायाम नव्हेत, तर ती एक कला आहे. योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणे.जे मन कायम भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये फिरतंय, यामुळे आपल्या शरीरात सिस्टिममध्ये निर्माण होणारा ताण-तणाव आणि मनातील नकारात्मक विचार आणि भावना यांना हाताळण्याची कला म्हणजे ’योग!’. जगभरातील 180 हुन अधिक देशांमध्ये सुरु असलेल्या आर्ट ऑफ लिविंग हॅप्पीनेस कोर्सचे संगमनेर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
सहा दिवस दररोज 3 तास चालणार्‍या या शिबिरात योगासन, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया शिकवली जाणार आहे. यामुळे ताण तणाव, क्रोध, नैराश्य, शारीरिक आणि मानसिक व्याधी, चिंता यापासून मुक्ती मिळते आणि मनुष्य वर्तमान क्षणात राहून आनंद घेऊ शकतो. सदर कोर्स श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ऋणानुबंध मंगल कार्यालयमागे, कॉलेजरोड, संगमनेर  येथे दिनांक 9 मे ते 14 मे रोजी, संध्याकाळी 6 ते 9 यावेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी संजय भागवत यांच्याशी संपर्क साधावा.