Breaking News

सौदी अरेबिया मधील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार

चेन्नई, दि. 04 -  बेकायदेशीर आणि व्हिसाची मुदत उलटूनही सौदी अरेबिया मध्ये रहात असलेल्या 20 हजार भारतीय कामगारांना मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे. यामध्ये तामिळनाडूतील नागरिकांचा आकडा अधिक आहे. सौदी अरेबिया सरकारच्या नियमानुसार 90 दिवसांच्या योजनेंतर्गत ते भारतात परतणार आहेत.
उपरोक्त योजने अंतर्गत 20 हजार 321 भारतीयांनी मायदेशी जाण्यासाठीचे अर्ज दिले आहेत, अशी माहिती सौदी अरेबियामधील भारतीय दूतावासातील अनिल नौटियाल यांनी दिली. यामध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत असणारे तामिळनाडूतील 1 हजार 500 जण आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश व बिहार राज्यांतील कामगारांचाही समावेश आहे. जे नायदेशी परतणार आहेत, अशांसाठी सौदी अरेबिया सरकारने राजधानी रियाधमध्ये विशेष केंद्र स्थापन केले आहे. सौदी अरेबियामध्ये बेकायदेशीर रहाणा-या सर्व भारतीय नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे, असे नौटियाल यांनी सांगितले.