नवी दिल्ली, दि. 04 - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. कैलाश चंद असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कैलाश हे हल्ला झाला त्यावेळी मनोज यांच्या निवासस्थानाजवळील परिसरात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यामुळे ते हल्लेखोरांना थांबवू शकले असते मात्र त्यांनी तसे केले नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. हल्लेखोर हे मला मारण्यसाठी आले होते असा दावा मनोज यांनी केला होता. रविवारी रात्री काही अज्ञांतांकडून त्यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आले होता. मात्र त्यावेळी मनोज घरात नसल्यामुळे सुखरूप बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे.