Breaking News

जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करणार्या सहा जणांना अटक

नांदेड, दि. 24 - नवीन नांदेड, घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करुन मुलास थापड, बुक्याने मारहान करु लागल्याने त्यांना मारु नका असे म्हणताच  धक्काबुक्की करुन अश्‍लिल शिवीगाळ करुन दगडाने डोक्यात मारुन दुखापत करुन भांडणे सोडवण्यास आलेल्यांनाही लाथाबुक्यांने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी  दिल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात 16 जणांविरुध्द अनुसूचित जाती जमाती ऍट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सहा आरोपिंना  अटक करण्यात आले असून सदरील घटना दि.21 मे रोजी सायंकाळी वाजेगाव येथे घडली असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बनकर यांनी  भेट दिली. फिर्यादी सौ.अनुसया आनंदा तारु, वय-45 वर्षे, व्यवसाय-भाजीपाला विकणे रा.मिलींदनगर वाजेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये 21 मे च्या सायंकाळी  6.00 वा. वरील ठिकाणी आरोपितांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आरोपी फिर्यादीच्या घरात घुसून तुझा मुलगा किशोर आनंदा तारु याने प्रताप शंकर गजभारे  यांच्या लहान भावासोबत भांडण करुन पळून आला म्हणून फिर्यादीच्या घरात घुसून माझ्या मुलास भांडण करुन घरात लपून बसलास म्हणून जातीवाचक शिवीगाळ  करुन मुलास थापड बुक्यांने मारहान करु लागले. त्यांना मारुनका असे म्हणताच फिर्यादीस धक्काबुक्की करुन अश्‍लिल शिवीगाळ केली. किरण सुरेश मोरे हा  सोडवण्यास आला असता त्यास दगडाने डोक्यात मारुन दुखापत केली. निखील जोगदंड, सुनिल हाटकर, राजू दुधमल हे सोडवण्यास आले असता. त्यांना लाथा  बुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन ग्रामीण पोलीस स्थानकात आर.एस.टी. अनुसूचित जाती जमाती अ.प्र.का. ऍट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा  दाखल करण्यात आला असून याप्रकरणी 6 आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे.