वणवे लावणा-यांवर वाई वनविभागाची करडी नजर
वाई, दि. 04 - वाई तालुक्यामध्ये समाज प्रबनही उन्हाळ्यामध्ये डोंगराना वणवे लावण्याचे प्रकार दरवर्षी वाढतच असून यापुढे खाजगी मालकीसह वनविभागाच्या डोंगरांना जाणीवपूर्वक वणवे लावणा-यांवर वाई वनविभागाची करडी नजर रहाणार आहे.
एप्रिल व मे महिन्याच्या दरम्यानंना मोठ्या प्रमाणात गैरसमजुतीने वणवे लावल्याने वनविभागाच्या कर्मचा-यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जतन केलेली वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून क्षणार्धात जळून भस्मसात होत असल्याने दरवर्षी निसर्गाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेवून वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन वाईचे वनक्षेत्रपाल प्रदीप बुधनवार यांनी केले आहे.
परंपरेनुसार डोंगरांना आग लावल्यामुळे पुढील वर्षी चांगले गवत उगवते या गैरसमजुतीने दरवर्षी एप्रील व मे महिन्यांत डोंगराना वणवे लावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने निसर्गाची मोठी हानी होते. चुकीच्या समजुतीतून लावलेल्या आगीमुळे लहानमोठे वन्यजीव, औषधी वनस्पती, उपयोगी वृक्ष जळून खाक होतात.
त्यामुळे दरवर्षी पुन्हा नव्याने लागवड करावी लागत आहे. परंतु वणव्यांमुळे परत हीच वनसंपदा आगीत होरपळून गेल्याने डोंगर बोडके होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जनतेने व निसर्गप्रेमींनी पुढे आले पाहिजे. बहुतांशी लागलेले वणवे हे खाजगी मालकीचे क्षेत्र पेटवल्यामुळेच लागले जात असल्याचे दिसून येत असल्याने संबंधित मालकांनी आग लावणे बंद केले तर वनसंपदा राखण्यासमदत होईल. यासाठी वनविभागातर्फे प्रत्येक गावात प्रबोधन केले जाते. आपल्याच वनांचे जतन करण्यासाठी ग्रामस्थांमधून वनसंरक्षक दल व वनसमित्या स्थापन करूनसुध्दा काही विघ्नसंतोषी लोक जंगलांना आगी लावत असतात. याबाबत कोणी वनविभागाला माहिती दिल्यास संबंधितांवर कारवाई करून तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते.