Breaking News

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग कामासाठी गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी

मॉन्टो कार्लो कंपनीच्या कार्यालयाला सिल; 8 कोटी 81 लाखांचा दंड

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - येथील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. मात्र या कामात विनापरवाना गौनखनिजाचे उत्खनन केले जातअ ोह. तालुक्यातील कुर्जलेपठार येथून सुमारे 12 हजार ब्रास गौणखनीजाचे उत्खनन केल्राचे उघड झाले आहे. या प्रकरणी महसूल विभागाने कारवाई करत मॉन्डो कार्लो कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. तर 8 कोटी 80 लाख 99 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
याबाबत वृत्त असे की, संगमनेरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरनाचे काम युध्दपातलीवर सुरु आहे. जवळपास या महामार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे समजते. काही कालावधीतच या कंपनीने एवढ्या लांबच्या पल्याचे काम काही वर्षातच पूर्णत्वाकडे नेले आहे. या महामार्गासाठी शासानने जमिनी हस्तांतरीत करुन त्याचा मोबदलाही जमिन धारकांना देण्यात येत आहे. जमिनीचे काही वाद वगळता हे काम सुरु आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनाच्या गौणखनीजाचे उत्खनन केले जात आहे. मात्र यासाठी लागणार्‍या परवानग्या मॉन्टो कार्लो कंपनीने घेतल्याच नाहीत. डोळासणे येथील मॉन्टो कार्लो कंपनीने गौणकइनज उत्खननाचा कुठलाही शासकीय परवाना न घेता बेकायदा पध्दतीने तालुक्यातील कुर्जले पठार येथील गट नं. 63/3 मधून सुमारे 12 हजार ब्रास गौणखीजाचे उत्खनन केले आहे. हा प्रकार उघड होताच महसूल विभागाच्यावतीने त्यांच्यावर कारवाई केली.
महसूल विभागाने सांगूनही दंडाची रक्कम त्यांच्याकडून भरली गेली नाही. तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी मॉन्टो कार्लो कंपनीच्या स्थावर व जंगम मालमत्ता सिल करुन जवळपास 8 कोटी 81 लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशान्वये शिखरापूरचे मंडलाधिकारी डी. एन. पवार, घारगावचे कामगार तलाठी साईनाथ ढवळे या महसूलच्या पथकाने रविवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मॉन्टो कार्लो कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तर कंपनीचे वाळूने भरलेले दोन डंबर घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. महसूलच्या या पथकामध्ये धांदरफळचे मंडलाधिकारी बी. वाय एखंडे, दरेवाडीचे कामगार तलाठी गणेश शिंदे, चिंचोली गुरवचे संग्राम देशमुख, पिंपळगाव देपाचे जांलिंदर सांगळे यांचा समावेश होता. गौण खनिझ उत्खनन संदर्भात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.