काँग्रेस दानवेंविरोधात राज्यभर आंदोलन करणार - अशोक चव्हाण
मुंबई, दि. 12 - राज्यातील तूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार, अशी खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असेही चव्हाण म्हणाले.
पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा नि त् जोरदार टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करीत आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असेही चव्हाण म्हणाले.
शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना साला दानवे अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.