उसाच्या क्षेत्रासाठी 100 टक्के ठिबक योजना राबवणार
सातारा, दि. 12 - थोड्याच दिवसात भाजीपाला नियमनमुक्तीप्रमाणे कडधान्य, तृणधान्य नियमनमुक्त करणार आहे, त्यावेळेसही प्रचंड विरोध होणार आहे हे माहित आहे. त्यामुळे आता जे विरोधक शेतकर्यांच्या नावाने संघर्ष यात्रा काढत आहेत त्यावेळेस काय करतात हे बघू. त्यावरुन कळेल त्यांची यात्रा खरी होती की खोटी, अशी टीका कृषी, पणन राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, माझे तर म्हणणे आहे शेतीला टॅक्स लावला पाहिजे म्हणजे नफा- तोट्याचे गणित समोर येईल आणि शेती फायद्याची, की तोट्याची हे कळेल, असे सांगून त्यांनी उसाच्या 3 लाख हेक्टर क्षेत्रासाठी 100 टक्के ठिंबक योजना राबवण्यात येणार असून त्यासाठीच्या कर्जाला फक्त 2 टक्के व्याज आकारले जाणार आहे. उर्वरित व्याज सरकार भरणार आहे, असेही जाहीर केले.
खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेल्या मतांवर बोलताना ते म्हणाले, मी चळवळीबरोबरच आहे. मी चळवळीचा पदयात्री असून त्यांच्याबरोबरच राहणार आहे. रघुनाथदादा पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना म्हणाले, दोघेही शेतकर्यांसाठी चळवळ करत आहेत. दोघांचे विचार आणि दिशा एक असल्याने आपसात आरोप-प्रत्यारोप करणार नाही. त्यापेक्षा शेतकर्यांची परिस्थिती कशी सुधारेल याबाबत विचार करणार आहे. प्रश्न महत्वाचा असून तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
गेल्या वर्षी तुरीचा भाव वाढला तर बातम्या झाल्या, मी त्यावेळी समर्थन केले होते. परंतु आता तुरीचा भाव पडला आहे. त्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक आहे. अनेक वर्षाचा प्रश्न असून त्यावर सरकार विविध स्तरावर काम करत आहे. माझ्याकडे पणन खाते आल्यानंतर मी भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला त्याला मार्केट कमिटी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार यांनी विरोध केला. आता जे संघर्ष यात्रा काढत आहेत त्यांनीही सभागृहात हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी केली. बाहेर एक भूमिका आणि सभागृहात दुसरी भूमिका त्यांची असते. परंतु या निर्णयामुळे पुणे-मुंबईत भाजीपाला शेतकर्यांना सन्मान मिळावा. शेतकर्याला भाव मिळायचा असेल तर त्यांना विक्री व्यवस्थेत आणले पाहिजे त्यासाठी हा निर्णय होता. आता थोड्याच दिवसात कडधान्य, तृणधान्य नियमन मुक्त करणार आहे. त्यानंतर पुन्हा सगळे व्यापारी, मार्केट कमिट्या, आडते, हमाल, तोलाईदार रस्त्यावर येणार आहेत. त्यावेळेस आता संघर्ष यात्रा करणारे काय करतात ते बघू. त्यांना जर खरच एवढा शेतकर्यांचा कळवळा असेल तर खरे, खोटे त्यावेळेस स्पष्ट होईल. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकर्यांना फायदा होणार आहे. आता तालुका हा घटक म्हणून काम करणार आहे. 100 हेक्टर नाही तर 10 हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी खात्याकडून यापुढे बंधार्याचे कामे बंद करण्याचा निर्णय बंद झाला असून कृषी सहाय्यकाने शेतकर्याच्या बांधावर जाऊन काम करायचे आहे. या निर्णयाला कोणाचाही विरोध असला तरी मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला आहे. रोहिणी नक्षत्रात उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान 15 दिवस राबवणार आहे. लवकरच मुख्यमंत्री फळप्रक्रिया अभियान सुरु केले जाणार असून कृषीमालावर आधारित उद्योग सुरु केले जाणार आहेत. शेतकर्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी साखळी पध्दतीने वेअर हाऊस बांधण्यात येणार आहे. शेतीतून निघालेला माल या वेअर हाऊसमध्ये ठेवून त्याला त्याच्यावर 75 टक्के रक्कम कर्जस्वरुपात लगेच दिली जाणार आहे. त्याचे 50 टक्के व्याज सरकार भरणार आहे. त्यामुळे त्याच्या तात्कालीन गरजा लगेच भागतील आणि शेतीमालाला योग्य भाव आल्यानंतर तो माल विकू शकेल. त्यामुळे शेतीमालाचे भावही पडणार नाहीत. प्रारंभी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ना. खोत यांचे स्वागत केले.