धरण बांधण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतक-याने दिली जमीन
मुंबई, दि, 04 - अकोला जिल्ह्यातील एका लहानशा गावातील दोन शेतक-यांनी आपली एक एकर जमीन धरण बांधण्यासाठी दान दिली आहे. आकाश खुले (वय 24) व त्याचे आजोबा सीताराम खुले (वय 70) अशी या शेतक-यांची नावे आहेत. या ठिकाणी धरण व छोटा कालवा तयार केला जाणार आहे. जेणेकरून या गावातील शेतीला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी लोकोपयोगी प्रकल्पांच्या उभारणीसाठी जमीन देण्यास स्थानिकांचा विरोध असताना ही उल्लेखनीय बाब समोर आली आहे. पातूर तालुक्यातील चारमोली गावात चौथ्या पिढीतील आकाशकडे स्वत:च्या मालकीची 3.5 एकर जमीन आहे. या ठिकाणी चांगला पाऊस होत असून हा भाग छोट्या पठाराखाली आहे. येथे धरण बांधले गेल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जमिनीचा काही भाग धरण उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे आकाशने सांगितले. पदवीधर असलेला आकाश पोलीस दलात आहे.