भिवंडीतील चप्पल कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग नियंत्रणात
भिवंडी, दि. 05 - भिवंडीतील चप्पल कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी लागलेली आग नियंत्रणात आली आहे. येथील आर्यन कम्पाउंड भागातील कारखान्याच्या गोदामाला ही आग लागली होती. सकाळी 9च्या दरम्यान ही आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या व तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या . या घटनेत जीवित वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. याबाबत बोलताना अग्निशामन दलाचे अधिकारी म्हणाले की, सकाळी 9च्या दरम्यान लागलेली आग नियंत्रणात आलेली आहे. ही आग शॉट सर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
