इमान अहमद पुढील उपचारासाठी अबुधाबीला रवाना
मुंबई, दि. 05 - 83 दिवसांपूर्वी इराणमधून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलेल्या जगातली सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इमान अहमद ही आज पुढील उपचारासाठी अबुधाबीला रवाना झाली. चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात तिच्यावर उपचारा केले गेले. इमानला ग्रीन कॉरिडॉरने मुंबई विमानतळावर नेण्यात आले.
अबुधाबी येथील बुर्जिल रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार होणार असून, सैफी रुग्णालयाने 29 पानांची कागदपत्रे बुर्जिल रुग्णालयाला पाठवली आहेत. सैफी रुग्णालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर मुफ्फझल लकडावाला म्हणाले की ज्याप्रमाणे मला येणार आहे, तशीच इमानलाहा माझी नक्कीच आठवण येईल. आता इमान विमान प्रवास करण्यासाठी सक्षम असून तिच्यासाठी विमानात कोणत्याही विशेष सुविधा पुरवण्याची आवश्यकता नसल्याचे सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मात्र, विमानाचे प्रवेशव्दार लहान असल्याने इमानसाठी विशेष विमान केले असल्याचे बुर्जिल रुग्णालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय इमानची बहिण शाईमा सेमिल हीने केलेल्या आरोपानंतर आम्ही तिला माफ केले असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.