Breaking News

जांभळेच्या बंधार्‍यातील स्वखर्चाने गाळ काढून शेती फुलविण्याचा मानस

अकोले, दि. 30 - अकोले तालुक्यातील जांभळे येथील शेतकर्‍याची जमीन बंधार्‍यासाठी संपादित करण्यात आली. मात्र या बंधार्‍याने संपुर्ण भागाची तहान भागवली. मात्र ज्या शेतकर्‍याची जमीन या बंधार्‍यासाठी संपादित केली, त्या शेतकर्‍याला या तलावातील पाण्याने गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी समाधानी झाल्याचे भाग्य मला मिळाले. त्या आनंदात या कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला. मात्र माझ्या काळया आईची आठवण म्हणून या शेतकर्‍याने स्वखर्चातून गाळ उपसा करुन माझ्या दुसर्‍या शेतात नेवून पुन्हा जोमाने शेती फुलविण्याचा मानस या शेतकर्‍याने पत्रकार नवनाथ जाधव यांच्याकडे व्यक्त केला असता या प्रकरणाची दखल राज्य मराठी पत्रकार संघाने अकोलेचे तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे केली.
यावेळी ज्या शेतकर्‍याने आपली जमीन प्रकल्पासाठी दिली. त्याच तलावातील स्वखर्चाने गाळ काढणीसाठी मागणी करताच देशमुख यांनी या शेतकर्‍याची कौतूक केले.
शासनाकडून मदत मिळेल मग मी शेती फुलवेल ही भावना माझी नाही. माझ्या काळ्या आईला माझ्या घरी नेवू द्या, तिच्या पिढयांपिढया मशागतीने शेती फुलविण्याचा आनंद माझ्या नातवांना व्हावा. हा दृष्टीकोन माझा असल्याचा सांगताच प्रशासनाने देखील या शेतकर्‍याचे कौतूक केले. काही क्षणात या शेतकर्‍याने दाखविलेला आदर्श इतर शेतकर्‍यांनी आपापल्या भागात राबविला तर आपला विकास आपणच करु शकतो. शासन देईल मग मी काही तरी करेल ही उदांत्त भावना मनातून काढली तर नक्कीच आपण स्वबळावर उभा राहू शकतो. या शेतकर्‍याचा संकल्प राज्यभरातील शेतकर्‍यांना प्रेरणादायी ठरेल.
जांभळे या गावात जन्मलेला प्रा. सागर नामदेव शिंदे हा पुणे येथील डी.वाय. पाटील या महाविद्यालयात प्राध्यापक असून दुसरा मुलगा सुरज नामदेव शिंदे हा जुन्नर तालुका पंचायत समिती विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. गावातील जोडलेली नाळ या प्राध्यपकाला पगारापेक्षा आईची सेवा करण्यासाठी सुरु असलेली धडपड त्याच्या या कार्यकर्तृत्वाने पहावयास मिळाली. नामदेव चांगदेव शिंदे यांनी आपल्या मुलांना जीवनात कोठेही जा मात्र आपल्या मातीला विसरु नका. या मातीत पिढयांपिढया निर्माण झाल्या. शहरात राहून देखील आपल्या मातीत पिकविलेले सोने हे अधिक महत्वाचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून या तलावातून स्वखर्चातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने गाळ उपसा होवून या तलावात या वर्षी जादा पाणी साठवणूक होईल अशी अपेक्षा त्यांनी निसर्ग राजाकडे केली.