Breaking News

देशमुख खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

अकोले, दि. 30 - तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख या पाच वर्षीय बालकाचा दीड वर्षापुर्वी झालेल्या हत्येचा तपास पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला.
13 ऑक्टोबर 2015 रोजी घटस्थापनेच्या दिवशी वेदांत गावातून अचानक नाहीसा झाला. त्याचा शोध घेण्यासाठी नगरहून श्‍वानपथकाला आणले. मात्र तो आढळून आला नाही. बिबटयाने त्यास पठविल्याची शंका ग्रामस्थांना आली. मात्र चार दिवसांनी अतिशय निर्जनस्थळी असलेल्या एका विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनात त्याची हत्या झाल्याने निष्पन्न झाले. दरम्यान तपासात वेग न आल्याने एक ऑक्टोबर 2016 पासून ग्रामस्थांनी गावतच बेमुदत उपोषण सुरु केले.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. वैभवराव पिचड यांनी या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपविण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस निरिक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. आमदार पिचड यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने पोलीस अधीक्षकांनी आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे सोपविले आहे.