आदर्श युवती पुरस्कार प्रियंका डोंगरे तर आदर्श युवक पुरस्कार धीरज ससाणे यांना प्रदान
अहमदनगर, दि. 04 - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिला जाणारा जिल्हा आदर्श युवती पुरस्कार कु.प्रियंका डोंगरे तर आदर्श युवक पुरस्कार धीरज ससाणे यांना पोलिस मुख्यालय येथील महाराष्ट्र दिनाच्या शासकिय कार्यक्रमात देण्यात आला. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार्थींना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व प्रत्येकी 10 हजार रु. चा धनादेश देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, मावळते जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी आदि उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत माजी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या निवड समितीने जिल्हाभरातून आलेल्या प्रस्तावातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कु.डोंगरे व ससाणे यांची पुरस्कारासाठी निवड केली. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील युवती प्रियंका नाना डोंगरे ही स्व.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मागील 8 वर्षापासून क्रीडा क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात अविरत कार्य करत आहे. या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.