संस्थाचालक व कर्मचार्यांच्या एकीने संस्था यशस्वी होईल
अहमदनगर, दि. 04 - आज कामगारांच्या भविष्याकरीता संघर्ष केल्यामुळे कामगारांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश बदलण्यासाठी चांगली भुमिका घेत धाडसी निर्णय घेतले आहेत. नगर अर्बन बँकेचे चांगल्या कामामुळे स्वरुप बदलले आहे. बँकेच्या झालेल्या वटवृक्षामध्ये कर्मचार्यांचा वाटा व योगदान महत्वाचे आहे. कामगारांनीही आपण सेवक आहोत, या नात्याने प्रामाणिकपणे कर्तव्य बजवावे. बँक कर्मचार्यांचा पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचार्यांना सहकार्य करु. ज्या ठिकाणी संस्थाचालक व कर्मचारी एकत्र असतात ती संस्था यशस्वी होते. अर्बन बँकेत संचालक मंडळ व कर्मचार्यांचे दृढ असलेले संबंध कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी केले.
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त योगराज खोंडे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. महाराष्ट्रातील कर्मचार्यांप्रती दिलेल्या योगदानाबद्दल अर्बन बँकेच्यावतीने श्री.खोंडे यांचा व्हा.चेअरमन शैलेश मुनोत यांनी सत्कार केला. यावेळी संचालक दिपक गांधी, अनिल कोठारी, अजय बोरा, कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्रीकांत शिरशिकर आदि उपस्थित होते. यावेळी बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी भारताच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीच्या दौर्यानिमित्त कलकत्ता येथे असल्याने त्यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे कार्यक्रमादरम्यान सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना व्हा.चेअरमन शैलेश मुनोत म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या कर्मचार्यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे बँकेने आज 1200 कोटी ठेवींचा टप्पा ओलंडला आहे. आता येत्या आर्थिक वर्षात 2000 कोटी ठेवींचा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे योगीराज खोंडे यांच्यासारख्या कुशल नेतृत्वाच्या हस्ते बँकेत झेंडावंदन होणे हे बँकेचे मोठे भाग्य आहे.
यावेळी अनिल कोठारी म्हणाले, नगरमध्ये आर्थिक क्षेत्रात नगर अर्बन बँक आज भक्कम पायावर उभी आहे. बँकेचे कर्मचारी देत असलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे बँकेचे अनेक मोठे प्रकल्प यशस्वी झाले आहेत. आता लवकरच सर्व शाखांमधून डि-मॅड सुविधा उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बँकेचे सहप्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे यांनी केले तर आभार संचालक दिपक गांधी यांनी मानले. यावेळी वरिष्ठ अधिकारी सतीश रोकडे, विलास बडवे, मनोज फिरोदिया, एम.पी.साळवे, डि.के.साळवे, राजेंद्र मुनोत आदिंसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.