Breaking News

वैष्णवदेवी नगरच्या अनेक भक्तांचे श्रद्धास्थान - लोकेश कुमारजी

अहमदनगर, दि. 04 - वैष्णवदेवी हे जागृत देवस्थान असल्याने सर्व भारतीयांचे मोठे श्रद्धास्थान आहे. भारतातूनच नव्हे तर परदेशातील नागरिकही येथे दर्शनासाठी येत असतात. हिंदूंचे एक मोठे दैवत म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. नगरमधील अनेक नागरिक येथे नियमित येत असतांना त्यांची योग्यप्रकारे सोय देवस्थानच्यावतीने करण्यात येत असती. देवस्थांनांचा उद्धार व्हावा, भाविकांमध्ये देवाबद्दल श्रद्धा निर्माण होवी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वैष्णवदेवी मंदिराचे मुख्य पुजारी लोकेश कुमारजी यांनी केले. वैष्णवदेवी मंदिराचे मुख्य पुजारी लोकेश कुमारजी नगरमध्ये आले असतां त्यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महापूजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्‍वस्त विजय कोथिंबीरे, ज्ञानेश्‍वर रासकर, पांडूरंग नन्नवरे, नगरसेवक दत्ता कावरे, संजय घुले, अशोक बाबर, बाबासाहेब जाधव, नानासाहेब भंवर, युवराज पोटे, राजेंद्र पाचे, संजय जाधव, गणेश राऊत, रमेश रासने, मटू शर्मा आदि उपस्थित होते.