मोहन जोशी यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार
सांगली, दि. 04 - नागठाणे (ता. पलूस) येथील बालगंधर्व स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणार्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, तर नटसम्राट बालगंधर्व युवा पुरस्काराने अभिनेते सुबोध भावे यांना गौरविण्यात येणार आहे.
बालगंधर्व स्मारक समितीच्यावतीने नागठाणे येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पुरस्काराचे वितरण जून महिन्यात नागठाणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप रोख 51 हजार रूपये व सन्मानचिन्ह, तर नटसम्राट बालगंधर्व युवा पुरस्काराचे स्वरूप रोख 25 हजार रूपये व सन्मानचिन्ह असे आहे. या बैठकीस स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष शहाजी कापसे, खजिनदार दत्तात्रय माने, सचिव प्रकाश यादव, सदस्य सुनिलसिंह माने, महेश लटके व विश्वास जाधव आदी उपस्थित होते.
मोहन जोशी यांनी नाट्य व चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कृर्यात सदा टिंगलम या एक हजारहून अधिक प्रयोग झालेल्या नाटकापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या घराबाहेर या मराठी चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते. त्यांची देबू चित्रपटातील संत गाडगेबाबा यांची भूमिका व देऊळबंद चित्रपटातील श्री स्वामी समर्थ यांची भूमिका गाजली होती. सन 2003 च्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचेही मोहन जोशी अध्यक्ष होते.
दूरदर्शन मालिकांमधून अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणारे सुबोध भावे यांची लोकमान्य- एक युगपुरूष या चित्रपटातील लोकमान्य टिळक यांची व बालगंधर्व चित्रपटातील नारायण राजहंस (बालगंधर्व) यांची भूमिकाही गाजली. सन 2015 च्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटातही त्यांनी अभिनय व दिग्दर्शनात छाप सोडली आहे.