Breaking News

अंगणवाडीमुळे मुलांमध्ये निर्माण होणार शिक्षणाची गोडी - सुवर्णा कोतकर

अहमदनगर, दि. 09 - दिवसेंदिवस शिक्षण पद्धती ही महागडी होत चालली आहे. स्पर्धेच्या युगात शिक्षणाचीही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत सर्वसामान्य लोकांना टिकून राहणे अवघड आहे. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित तर राहतात. परंतु शिक्षणाची गोडी कमी होताना दिसून येते. अंगणवाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा तर फायदा होणार आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केले.
प्रभाग 34 मधील सुशांतनगर, तळेवस्ती परिसरात अंगणवाडीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेविका सुनीता कांबळे, सविता कराळे, गायकर, विधाते, आजबे, संगीता काळे, निकिता काळे, मंगल मराठे, तांबोळी, कारले, विमल मांडगे, अभिजीत काळे, योगेश कोतकर, राजू कोतकर, सुजाता पवार, किरण आजबे, सौरभ आजबे आदी उपस्थित होते. यावेळी 3 अंगणवाड्या खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
कोतकर पुढे म्हणालय की, अंगणवाडी ही शिक्षणाचा पाया आहे. बालवयात विद्यार्थ्यांना अपण जसे घडवावे, तसा तो घडला जातो. घरातील संस्कारापेक्षा शैक्षणिक संस्कार हे मुलांवर प्रभावीपणे जोपासले जातात. इंग्लिश मीडियममुळे मराठी शाळांवर याचा परिणाम दिसू लागला आहे, असे ते म्हणाले. यावेळी नगरसेविका सुनीता कांबळे, सविता कराळे यांनी मनोगत व्यक्त केले.