योसेफ महानाट्यात हरकले अबालवृध्द ; उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने प्रेक्षक मंत्रमुग्ध
अहमदनगर, दि. 09 - अहमदनगर सुवार्ता संघ व ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित फेथ फाऊंडेशन प्रस्तुत बायबल वर आधारित योसेफ या धार्मिक मराठी महानाट्यात आबाल वृध्द अक्षरक्ष: हरकून गेले. बॉईज हायस्कुलच्या मैदानावर सादर करण्यात आलेल्या या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जीवंत केले. असत्याच्या विरोधातील संघर्ष दाखवून, शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला.
शहरात पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या ख्रिस्ती धार्मिक नाटिका पहाण्यासाठी समाजबांधवांनी गर्दी केली होती. या नाटिकेत पुणे येथील 55 कलाकारांचा सहभाग होता. भव्यदिव्य व्यासपीठ, तत्कालीन वेशभुषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने सादर करण्यात आलेल्या नाटिकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. एलईडी वर बदलणारे डिजीटल बॅगराऊड तत्कालीन परिस्थितीचा आभास करुन देत होते. अन्याय, अत्याचाराचा बिमोड करणार्या जोसेफच्या पात्राने उपस्थितांमध्ये जणू स्फूरण चढले होते. या नाटिकेस प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
संघाचे अध्यक्ष तथा महानाट्याचे आयोजक चंद्रकांत उजागरे प्रास्ताविकात म्हणाले की, बॉईज हायस्कुल जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, येथे धार्मिक सभांना व प्रार्थना कार्यक्रमांना बंदी करण्यात आलेली नाही. या जागेत बांधकाम होवू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. ख्रिस्ती बांधवांमध्ये गैरसमज पसरला असून, येथे होणार्या प्रार्थना व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेवून प्रभु येशू ख्रिस्तांची शांततेची शिकवण सर्वांपर्यन्त घेवून जाण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जॉन उजागरे यांनी केले.