जनसेवा विकास आघाडीच्या नगरसेवकांचे काम चालू करण्यासाठी उपोषण तर बंद करण्यासाठी मागासवर्गीय शेतकयांचे धरणे आंदोलन
राहाता, दि. 04 - राहाता नगरपालिकेच्या कातनाला साठवण तलाव टप्पा क्र. 2 चे काम त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी जनसेवा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सुरु केलेले उपोषण मुख्याधिकायांनी लेखी आश्वासन देवून तलावाचे प्रत्यक्ष काम पोलीस बंदोबस्तात सुरु केल्यानंतर नगरसेवकांनी आपले उपोषण मागे घेतले.
राहाता नगरपालिकेने वैशिष्ट्य पुर्ण योजनेअंतर्गत कातनाल्यात साठवण तलाव टप्पा 2 चे काम सुरु केले होते. सदरचे काम नंतर बंद पडले. हे काम नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे बंद पडल्याचा आरोप करत सत्ताधायांच्या विरोधात पालिकेतील विरोधी असलेल्या जनसेवा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बंद पडलेले सदरचे काम तातडीने सुरु करा. अन्यथा या विरोधात उपोषणास बसण्याचा इशारा नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात केला होता. त्यानुसार जनसेवा विकास आघाडीचे नगरसेवक गटनेते अॅड. विजय सदाफळ, साहेबराव निधाने, भिमराज निकाळे, सलिम शाह, हरिभाऊ पवार, नगरसेविका सविता सदाफळ, अनुराधा तुपे, सुरेखा मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, उपनगराध्यक्षा गितांजली सदाफळ यांचेसह आजी माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले होते. परंतू उपोषण सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पालिकेच्या मुख्याधिकायांनी उपोषणकत्र्यांची भेट घेवून नगरपरिषदेने बंद असलेले साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करण्यासाठी मक्तेदारास आदेशित केलेले असुन सदर कामास कोणाकडूनही अडथळा निर्माण होवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मागवून हे काम तातडीने सुरु करीत असल्याचे लेखी आश्वासन उपोषणकत्र्यांना दिल्यानंतर उपोषणकत्र्यांनी आपले उपोषण मागे घेतले तर राहाता नगरपरिषदेने कातनाला पिण्याचे पाणी साठवण टप्पा क्र. 2 चे सुरु केलेले काम बंद करावे या मागणीसाठी साकुरी येथील मागावर्गीय शेतकयांनी राहाता येथील विरभद्र मंदीरासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात संबंधीत शेतकयांनी म्हटले आहे की, राहाता येथील जलसंपदा विभागाच्या जागेत कातनाल्याच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचे खोदकाम करु नये अशी नोटीस जलसंपदा विभागाने राहाता नगरपालिकेला दिलेली असुन संबंधीत केस जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी शिर्डी यांच्यापुढे न्यायप्रविष्ठ असल्याने या तलावाचे खोदकाम करु नये. कातनाला साठवण तलावाचे खोदकामात आमच्यावर अन्याय होत असुन दलित मागासवर्गीय शेतकरी शेती करीत असलेल्या जागेवर जलसंपदा विभागाची कुठलीही परवानगी न घेता आपण खोदकाम करुन आमच्यावर अन्याय करीत असल्याचेही संबंधीत शेतकयांनी राहाता नगरपालिकेच्या मुख्याधिकायांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच हे बेकायदेशीर काम केल्यास त्यामुळे होणाया परिणामांची होणारी सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून आपली राहील. या अन्यायाचे विरोधात राहाता बाजारतळ येथे आम्ही सर्व दलित शेतकरी आजपासून धरणे आंदोलन करत आहोत. असेही या निवेदनात म्हटले असुन या निवेदनावर बाबासाहेब बळवंत बनसोडे व योसेफ बाबुराव बनसोडे यांच्यासह अन्य शेतकयांच्या स्वाक्षया आहेत.