गुन्हेगारांना धडकी भरली पाहिजे : चंद्रकांत दळवी
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : सर्वसामान्य गरीब जनतेला हेलपाटे मारायला लावू नका. प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा. तडीपार प्रकरणांच्या बाबतीत जुनमध्ये पोलीस अधिकार्यांसमवेत एक बैठक घेऊ. गुन्हेगारांना धडकी भरली पाहिजे असे काम प्रांताधिकार्यांनी करावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केल्या.
विभागीय आयुक्त दळवी यांनी सातारा येथील प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसिलदार कार्यालयास भेट देवून आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी सिंघल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवून दळवी यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांनी अत्यंत सविस्तर आढावा घेतला. प्रांताधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालयाच्या सर्व विभागांना भेटी देवून सविस्तर माहिती घेऊन ते दळवी म्हणाले, प्रांताधिकार्यांनी गुन्हेगारांना धडकी भरेल असे काम करा. तडीपारीची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावी. कार्यालयामधील प्रलंबित प्रकरणे निकालात काढा.
वांग-मराठवाडी, महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांबाबत जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत घालावी. असे सांगून दळवीे म्हणाले कोतवाल पदे, पोलीस पाटील पदे ऑक्टोबरपर्यंत भरावेत. तक्रार निवारण तीन महिन्यात व्हायला पाहिजे. दैनंदिन कामकाजात झिरो पेन्डन्सी व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
तहसील कार्यालयात विभागीय आयुक्त दळवी यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाला भेट देवून कामाचा आढावा घेतला. यावेळी संजय गांधी योजनेबाबत 35 प्रकरणे एक वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असल्याचे दिसले. त्यावर ते म्हणाले सर्वसामान्य गरीबांनी आजून किती हेलपाटे मारावेत. इतका वेळ का लागला त्यांना न्याय कधी मिळणार? ही प्रकरणे तात्काळ निकालात करा. सर्वसामान्यांना हेलपाटे मारायला लागू नये,असे काम यापुढे झाले पाहिजे. याचा आढावा मी महिन्यातून एक दिवस भेट देवून घेणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. सातारा प्रांताधिकारी कार्यालय परिसरात नूतन प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार करुन सादर करावा. या परिसरात असणार्या सर्व शासकीय कार्यालयांचा समावेश करावा. एक सुंदर देखणी वास्तू आपल्या कार्यकालात उभी करण्याच्या अशा सूचना विभागीय आयुक्त दळवी यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना दिल्या.