Breaking News

वासुदेवाची मती होते जेंव्हा भ्रष्ट....!

दि. 24, मे - ज्या स्त्रीसुक्तात बहुजनांचा जन्म अंगठ्यातून झाला म्हणून ते शुद्रादी शुद्र आहेत असे म्हटले त्या स्त्रीसुक्ताने पांडूरंगांची पुजा करावी असे तारे तोडले  त्या बाबा पुरंदरेला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची उपरती आताच का सुचली? दर्शन नाकारले म्हणून बाबाचा कैवार घेऊन थयथयाट करणारा सातार्‍याचा वासुदेव आताच  झोपेतून कसा उठला ? बाबाची भाटगीरी करणारा या वासुदेवाला खाजवायची एव्हढीच हौस आहे तर बहुजनांचा एकमेव दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पुजेपासुन एव्हढी  वर्ष बहुजनांना उपेक्षित ठेवणार्‍यां बडव्यांविरूध्द गुळणी धरून बसलेल्या या वासुदेवाला पुरंदरे प्रकरणातून बहुजनांचा कळवळा का आला?
महाराष्ट्रात वासुदेवांची एक स्तुत्य परंपरा आहे. भल्या पहाटे उठून गाव जागवित समाजप्रबोधन करण्याचं  काम  ही  परंपरा  करते, याच परंपरेची सुधारीत आवृत्ती  म्हणचे आजची मुद्रीत माध्यम. वासुदेवाच्या पाठोपाठ  गावात येऊन प्रबोधनाची जबाबदारी पार पाडतात म्हणून तेही वासुदेवच. मुद्रीत वासुदेवाच्या वंशावळीतला  सातार्‍यांच्या एका वासुदेवाने मुळ वासुदेवाची प्रतिमाच कलंकीत केली आहे.
अवघ्या महाराष्ट्रातील बहुजनांनी ज्याला दुषणं लावली त्या सरकार पुरस्कृत ‘महाराष्ट्र भुषण’ पुरंदरेला पांडुरंगाचं दर्शन मिळाल नाही म्हणून सातार्‍याच्या या वासुदेवाचं  पित्त खळबळु लागल आहे.पित्त खळबळल्याने  अग्रलेखातून उलट्या करू लागला आहे.
शेकडो हजारो वर्ष बहुजन समाजाला  आपल्या पांडुरंगापासून जातीवादी बडव्यांनी जाणीवपुर्वक दुर  ठेवले त्या  बडव्यांची  वकीली  करणारा हा वासूदेव पुरंदरेंच्या  निमित्ताने सरकारी यंत्रणेवर  घसरला आहे. पुरंदरेला अति महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश हवा होता, तो नाकारला गेल्याने बहुजनांनी दुषण  ठरविलेल्या पुरंदरेचा हा सातार्‍याचा भाट सरकारी यंत्राणेला बडव्यांची उपमा देतो आहे. याचाच अर्थ या निमित्ताने त्या पुर्वीच्या बडव्यांनी बहुजन समाजाला या  पध्दतीनेच झिडकारले हे तो अप्रत्यक्षपणे मान्य करतात. या निमित्ताने या वासुदेवाला  बहुजन भक्तांचा चांगलाच कळवळा आलेला दिसतो आहे. पुरंदरेला प्रवेश  नाकारण्याआधी दोन दिवस एका भक्ताला मंदीरात मारहाण झाल्याचा दाखला हा वासुदेव देतात आहे. मारहाणीची  घटना घडली   तेंव्हाच ही  यंत्रणा  सरकारी   बडवे  आहे असा अग्रलेख वासुदेवाला लिहीण्याची  बुध्दी का नाही सुचली ? ही सारी  नौटंकी  आहे  पुरंदरेच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी हा वासुदेव पुन्हा  एकदा बहुजन भक्ताःचा खांदा वापरू पहातो आहे?
कोण बाबा पुरंदरे ? 93 वर्ष होईपर्यंत कधीच पांडुरंगाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली नाही मग आता ? आणि दर्शनच घ्यायचे होते तर व्हिआयपी मार्गाचा आग्रह का  ? या मंडळींना बहुजनांचाच नव्हे तर बहुजन दैवतांचा किती द्वेष आहे हे बडवे हटाव चळवळी दरम्यान, महाराष्ट्राने पाहीले आहे. तेव्हा  कुठे  होता वासुदेव अन् त्याचा  तो  ‘भुषण’? तेंव्हा तर बहुजन आणि बहुजन दैवतांना अंगठ्यातून जन्म घेणारे शुद्र असे हिनवत होते. मग शुद्र दैवताचे दर्शन ? कशासाठी ही आदळआपट?  बहुजनांचा इतकाच कळवळा होता तर कथित शिवशाहीर आणि भाट वासुदेव स्वराज्य दैवतांची बदनामी करणार्‍या विठ्ठल तिडके प्रकरणात  दातखीळ बसल्यागत गप   का पडले ? बंद करा ही नाटकं. महाराष्ट्र आता जागा झालाय.