वन विभागाच्या निरीक्षण कुटीची दयनिय अवस्था
बुलडाणा, दि. 05 - मलकापूर (प्रतिनिधी) - मलकापूर-बोदवड रोडवर वन विभागाने लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या निरीक्षण कुटीची दयनिय अवस्था झाली असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
मलकापूर बोदवड रोडवर वन विभाग बुलडाणाच्या वतीने वन परीक्षेत्र मोताळा अंतर्गत सन 2009 मध्ये निरीक्षक कुटीचे बांधकाम करण्यात आले. लाखो रुपये खर्च करुन सिमेंट काँक्रीटचे ईमारत उभारण्यात आली. तत्कालीन मुख्य वन संरक्षण अमरावती एस.डी.सोनटक्के यांच्या हस्ते 7 सप्टेंबर 2009 रोजी उद्घाटन करण्यात आले. वन विभागाने निरिक्षण कुटी बांधली परंतू तेथे वन विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी राहत नसल्याने या कुटीची भंगार अवस्था झाली असून ह्या कुटीच्याा दरवाजे खिडक्या सुध्दा चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. भंगार अवस्थेत असलेल्या ह्या निरीक्षण कुटीकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने याच्या बांधकामासाठी लागलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे. शासनाच्या लाखो रुपयाचा अपव्यव करणार्या वन विभागाच्य अधिकार्यांवर कारवाईची मागाी जनतेमधुन होत आहे.