नवविवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
बुलडाणा, दि. 05 - विवाहाला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच एका नवविवाहीत तरुणावर काळाने झडप घातली. झालेल्या अपघातात सदर तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 04 मे रोजी नांद्रा फाट्यानजीक घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिध्दार्थ गवई वय 28 वर्ष रा. पाचला ता. मेहकर या तरुणाचे दोनच दिवसापुर्वी लग्न झाले होते. काही कामानिमित्त सिध्दार्थ गवई हे आपले गांव पाचला येथुन मेहकर येथे येत असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेने पाचला गावात शोककळा पसरली असून घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.