परिसरातच सुविधा झाल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहील
अहमदनगर, दि. 04 - ग्रीन जीममुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दररोज विशिष्ट टायमिंगला व्यायामशाळेत किंवा शिबीरात जाण्याचा अनेकांना कंटाळा येत असतो. त्यामुळे आपल्या परिसारातच अशी सोय झाल्यास नियमित व्यायामही होऊ शकतो. त्यामुळे या ग्रीन जीममुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. नागरिकांनीही याचा चांगला उपयोग करावा व ही आपली जीम आहे याच भावनेतून त्याचा वापर करावा, असे आवाहन खो-खो संघटनेचे अध्यक्ष सीए अशोक पितळे यांनी केले.
प्रभाग क्र.30, आदर्श कॉलनी येथील ग्रीन जीमचे उद्घाटन सीए अशोक पितळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सौ.सुनिता फुलसौंदर, सभागृहनेते अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभय कांकरिया, सचिन गुगळे, विक्रम दाभाडे, प्रतिक पाचपुते, राजेंद्र मुनोत, मनोज लुणावत, सचिन काबरा, संदिप शिंगवी, मनिष मुथा, प्रसाद ठोकळ, बलराज पाटील, चिन्मय साबळे, गोपी पाटील, शरद कोके,धिरज मुनोत,विशाल भालेराव, मच्छिंद्र पवार, गणेश बुरा, वर्धन मुथा, विशाल दाभाडे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना सीए पितळे म्हणाले, मुलभूत विकास कामे हे सातत्याने होतच असतात, परंतु भगवान फुलसौंदर यांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभागात अशाप्रकारची ग्रीन जीम निर्माण केली आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या जवळ व्यायामची सुविधा झाली आहे. त्यातून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी नगरसेविका सौ.सुनिता फुलसौंदर म्हणाल्या, सध्याच्या धावपळीच्या युगात आपले आरोग्यकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषत: महिलांमध्ये अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतात. नियमित व्यायाम करणे, जाणे हे महिलांना दैनंदिन कामातून शक्य होत नाही. परंतु जवळच अशी सोय झाल्याने नियमित प्राथमिक व्यायाम होऊ शकतो. याच भावनेतून या भागात ही ग्रीन जीमची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.