Breaking News

दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचे निधन

नवी दिल्ली, दि. 07 - दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचे आज निधन झाले. त्या 86 वर्षाच्या होत्या. शुक्रवारी रात्री त्यांनी  नोएडा येथील राहत्या घरी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव वैज्ञानिक संशोधनासाठी प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखक  विक्रम सेठ यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांनी आपल्या संपत्तीत मुलींना समान वाटा दिला होता.
लीला यांचा जन्म 1930 साली लखनौमध्ये झाला होता. 1978 साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झाली. लीला सेठ या 1991  साली राज्यातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणूनही कार्यरत होत्या.